प्रवीण भाटे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस योद्ध्यांना विविध साहित्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. या महामारीला लढा देण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलीस बांधव गेल्या वर्षभरापासून धजत आहेत, नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे आपले काम नित्य नेमाने बजावत आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शन केले. त्यानुसार आर. डी. युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सॅनिटाईजरच्या ५ लिटरच्या २० कॅन व ५०० मास्क हे पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भगत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रविण भाटेंना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. विक्रांत युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष मनिष उर्फ शंभु बागुल हेही उपस्थित होते.

यावेळी सदर कार्यक्रमास शेखर भाऊ फरताळे, दिपक चव्हाण, चंद्रकांत कोळावणे, राहुल गावंड, सागर जाधव, राहुल आर ससाणे, राहुल एम ससाणे, विनोद कानडे, गणेश मोरकर, नितीन मोरे, अमित चंनाग्राम, प्रतिक संगमनेरे, अविनाश भाटे, लखन कासारे आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!