कावनई किल्ल्यावरून कोसळली दरड ; सुदैवाने कोणतीही हानी नाही : नागरिकांनी घाबरून जाऊ नये – तहसीलदार अभिजित बारवकर

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात चार पाच कुटुंबाची छोटेखानी घरे असून दैव बलवत्तर म्हणून त्यांच्यापर्यंत दरड आली नाही. सध्या दरड कोसळणे स्थिती स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले आहे. प्रशासनाकडून ह्या घटनेकडे सूक्ष्म लक्ष दिले जात असून उपाययोजना केल्या जाणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे कळवण्यात आले आहे. कावनई भागात पाऊस शांत असल्याने किल्ल्यावरून पडलेली दरड पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!