इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी आज ९० वर जाऊन पोहोचली आहे. आज फक्त ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नव्या १० व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊन शिथिल होताच घोटी, इगतपुरी ही शहरे आणि मोठ्या गावांमध्ये नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. घोटी शहरात कोरोना संबंधी शासन आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा, लक्षणे आढळून आल्यास लपवाछपवी न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008