
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
मुंबईहुन नाशिकला येताना घाटामध्ये टोप बावडी ( विहीर + बारव ) ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली होती. त्या ठिकाणाचा परिसर स्वच्छ करून व प्रतिमा पुजन करुन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती साजरी करण्यात आली.
ह्या इतिहास कालीन टोप बावडीची दुरुस्ती व देखभाल पुरातत्व विभागाने करावी अशी मागणी यावेळी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी अखिल भारतीय धनगर समाज, जय मल्हार ग्रुप इगतपुरी, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, कृष्णा परदेशी, विजय गुप्ता, रहिम शेख आदी उपस्थित होते.