मुंढेगावजवळ अज्ञात वाहनाने २ कामगारांना उडवले ; १ ठार, १ जखमी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नासिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने गॅस कंपनी समोर जिंदाल कंपनी जवळ २ कामगारांना धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन वेगाने पसार झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच पंकज तिवारी वय ३० हा कामगार मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. संदीप कुमार छोटेलाल प्रसाद रा. जिंदाल कंपनी हा कामगार गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु झाले आहेत. भरधाव वाहने कामगारांना बऱ्याचदा हुलकावणी देऊन अपघात घडवत असल्याची ह्या भागात चर्चा आहे.

Similar Posts

error: Content is protected !!