इगतपुरीनामा न्यूज – सभापती झाल्यापासुन तीन महिन्यात १८ कामे मार्गी लावली आहे. संस्थेसाठी जागा खरेदी करणे, अतिक्रमण काढणे, नवीन गाळे बांधणे, जागा विकसित करणे, जीर्ण झालेले गाळे पाडुन नवीन गाळे बांधणे, नवीन शौचालय बांधणे आदी कामे सुरु आहेत. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यापाऱ्यांकडुन जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यासाठी शेतकऱ्यांच्या बाजुने खंबीर उभा राहणार आहे. मागील वर्षीच्या जुन, जुलै, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यावर्षी नफ्यात दुपटीने वाढ केली आहे असे प्रतिपादन सभापती ज्ञानेश्वर लहाने यांनी केले. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. आमदार हिरामण खोसकर यांनी बाजार समितीला २५ लाखांचा निधी व्यापारी संकुल बांधण्यासाठी दिला. साडे सात लाखाचे पथदीप, सिमेंट काँक्रीटकरणसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, कृऊबाचे संचालक निवृत्ती जाधव, भाऊसाहेब खातळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सचिव जितेंद्र सांगळे यांनी प्रास्ताविक केले, सुत्रसंचालन उपसचिव ज्ञानेश्वर कातोरे यांनी केले तर आभार उपसभापती शिवाजी शिरसाठ, संचालक संपत वाजे यांनी मानले. सभेला आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, संचालक निवृत्ती जाधव, सुनील जाधव, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश जाधव, भाऊसाहेब कडभाने, सुनीता संदीप गुळवे, आशा खातळे, राजाराम धोंगडे, अर्जुन भोर, संपत वाजे, भरत आरोटे, नंदलाल पिचा, रमेश जाधव, दिलीप चौधरी, ॲड. मारुती आघाण यांच्यासह खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन जयराम धांडे, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, शेतकरी प्रतिनिधी, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन, व्यापारी, हमाल आदी उपस्थित होते.