इरफान शेख यांच्या प्रयत्नांनी ठाणापाड्यात दान फाउंडेशनतर्फे कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

हातावरच्या नागरिकांची परवड आणि उपासमार या दोन्ही गोष्टी कोरोना संसर्गाने सोडल्या नाहीत. जिल्ह्याच्या उंबरठ्यावर अनेक खेडे, वस्त्यांवर पोहचलेल्या कोरोना संसर्गाने ग्रामीण भागही पिंजून काढला आहे. अशा संकट काळात मात्र आपण काही तरी इतरांचे देणे लागतो हा उदांन्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून नाशिकच्या दान फाउंडेशनने ठाणापाडा ता. त्र्यंबकेश्वर येथे २६१ लाभार्थ्यांना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला.

ठाणापाडा ता. त्र्यंबकेश्वर येथे नाशिकच्या दान फाउंडेशनने माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या पुढाकारातून २६१ लाभार्थ्यांना कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे, माकप जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख, जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, सरपंच महेंद्र पवार, मंडळ अधिकारी एच. जी. कुलकर्णी, दान फाउंडेशनचे मधुकर शर्मा, निलेश शर्मा, मीना शर्मा, ग्रंथ शर्मा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात साडी, लहान मुलांचे कपडे, स्कार्प, सॅनिटायझर, मास्क आदींसह जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे.
कोरोना काळात ग्रामीण भागात या उपक्रमाद्वारे केलेली मदत वाखाण्याजोगी आणि महत्वाची आहे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने ती मनभरून घ्यावे याची उक्ती लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आली. यावेळी भाऊराज राथड, पंडित गावीत, गणपत गावीत, रमेश वार्डे, अंबादास फसाळे, प्रवीण बरफ, चंदर चौधरी आदींसह तलाठी, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.

कोरोना काळात दान फाउंडेशनने ग्रामीण भागात केलेली मदत प्रेरणादायी तसेच कौतुकास्पद आहे. त्यांनी २६१ लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करून मनोबल वाढवले आहे.
- इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!