चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/७०८३२३४०२१

मराठी संमेलन नाशिक नगरीला !
भरे कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीला !!
मान सन्मान मिळे मराठी भाषेला !
माता गोदामाईच्या पवित्र कुशीला !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

अखिल भारतीय मराठी भाषेला !
चौऱ्याण्णव्या साहित्य संमेलनाला !!
सन्मान मिळती नाशिक नगरीला !
स्वागता साहित्यिक मांदियाळीला !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

नाशिक असे कुसुमाग्रजांचे माहेर !
मराठी साहित्याचा भरे येथे दरबार !!
संमेलनाचे अध्यक्ष असे महान थोर !
नाव त्यांचे असे जयंत नारळीकर !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर !
वैज्ञानिक साहित्य त्यांचे विचार !!
खगोल शास्रात अभ्यास असे फार !
बाल विज्ञान साहित्याचा करी प्रचार !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

स्वागताध्यक्ष लाभले छगन भुजबळ !
मराठी साहित्य संमेलनाचे असे बळ !!
तेवत ठेऊ मराठी साहित्य चळवळ !
हीच असे नाशिक करांची तळमळ !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

लोकहितवादी मंडळ असे यजमान !
आदराने करे पाहुण्यांचा सन्मान !!
माय मराठी भाषेचे गाऊ गुण गाण !
मराठी भाषा असे महाराष्ट्राची शान !!
चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!