कवितांचा मळा : शांतीदूत बुध्द

कवी : नारायण दादासाहेब गडाख

राजा शुध्दोधन
माता महामाया
वसे लुंबिनीला
गौतमाची काया

दुःख समाजाचे
अनावर झाले
त्यागुनी संसार
संन्यासी ते झाले

सुखाला सोडूनी
तप आरंभिले
बोधी वृक्ष छाया
ज्ञान प्राप्त केले

रागाचा द्वेषाचा
मत्सर करावा
दया क्षमा शांती
मार्ग स्वीकारावा

हीच शिकवण
गौतमाने दिली
बंधुता समता
सूत्र अंगिकारली