इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीने सूचनांची अंमलबजावणी केली. घोटी बाजार समितीच्या वतीने भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. ह्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांची कोविड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या निर्णयाचे शेतकरी व व्यापारी बांधवांनी स्वागत केले आहे. व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने शेतमालाचे दर वधारले. यामुळे शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला. बाजार समितीच्या सर्व घटकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या सुचना पाळाव्यात असे आवाहन प्रशासक संदीप गुळवे, गोरख बोडके यांनी केले.
कृषि उत्पन्न बाजार समिती घोटीच्या खंबाळे येथील भाजीपाला बाजारात आलेले शेतकरी, व्यापारी, हमाल, चालक यांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या. यावेळी बाजार समितीचे प्रशासक संदीप गुळवे,गोरख बोडके, तुकाराम वारघडे, नाना गोवर्धने, सुदाम भोर, नंदलाल भागडे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सचिव जितेंद्र सांगळे, कातोरे साहेब आदी उपस्थित होते.