
इगतपुरीनामा न्यूज – पिस्तुलाचा धाक दाखवुन लुटमार व दहशत पसरविणारा घोटी येथील एक इसम विनापरवाना बेकायदा अग्नीशस्त्र साठा घेऊन बोरटेंभे येथे येणार असल्याची गुप्त खबर इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाचा सापळा रचुन सिनेस्टाईलने संशयितास मुद्देमालासह रंगेहाथ पकडून जेरबंद केले. २२ जूनला रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी पोलीस पथक तैनात करून बोरटेंभेजवळ संशयित आरोपी वैभव विनायक बोराडे, वय २७ रा. रामराव नगर, बेकरी गल्ली, घोटी हा दोन देशी बनावटीचे पिस्तुल व एक एअरगन असा अग्नीशस्त्राचा साठा घेवुन आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार दीपक आहीरे, गोरक्षनाथ संवत्सरकर, किशोर खराटे, पोलीस शिपाई विनोद टिळे, गिरीष बागुल यांनी सापळा रचून दोन पंचासमक्ष रंगेहाथ पकडुन अटक केली. आरोपी वैभव बोराडे यास ताब्यात दोन देशी बनावटीचे पिस्तुल व एक एयर गन असा शस्त्र साठा हस्तगत केला. हस्तगत केलेल्या शस्त्राची एकुण किंमत अंदाजे ३२ हजार ५०० रूपये आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई विनोद गोविंद टिळे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. वैभव विनायक बोराडे यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे व पोलीस पथक करीत आहेत.