इगतपुरी तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने होतेय कमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुका वासीयांसाठी आजचा दिवस सुद्धा खुशखबर घेऊन आला आहे. संपूर्ण तालुक्यात आज तब्बल १० जणांनी कोरोनाचा पराजय केला आहे. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार फक्त ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेणाऱ्यांची संख्याही आज अखेर पर्यंत ७७ वर आली आहे. इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची ही सुरवात मानली जाते. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारचे लॉकडाऊन संपण्यापूर्वी इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याची दाट शक्यता आहे. तथापि नागरिकांनी पुढील काळात नियमांचे पालन केले तरच हा आनंद दीर्घकाळ घेता येईल.

मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899
काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत. 
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी