इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख येथील पुलाच्या खाली आज सकाळी वाघेरे येथील 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर रक्त वगैरे असून हा घातपात असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस पाटील मधुकर धांडे यांनी वाडीवऱ्हे पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस पथक दाखल झाले. पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा वगैरे कार्यवाही करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मयत युवकाचे नाव योगेश गवारी असे असून तो वाघेरे येथील रहिवासी आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांना सहाय्य करण्यासाठी घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले आदी हजर होते.