इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ ( वाल्मीक गवांदे, इगतपुरी )
कोरोना संकटात रूग्ण तपासणी व उपचारा दरम्यान डॉक्टरांसह वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचव आरोग्य महत्वाचे आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व साई ग्लोबल ट्री शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी ग्रामीण रूग्णालय कोविड सेंटरला वॉशेबल दहा पीपीई किट, ग्लूकोज ( ओ आर एस ) पावडर व हँडग्लोजची पाकीटे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे आदी उपस्थित होते.
तालुक्यात वैद्यकीय उपचार प्रणाली व तत्पर रूग्ण सेवा चांगली राबवली गेल्याने सध्या कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसत आहे. तरीही तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी सुरू असुन तालुक्यात वैद्यकीय उपकरणे व लसीकरण आदींचा कमी प्रमाणात साठा आहे. तरीही जास्तीत जास्त वैद्यकीय साधनाची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधिक्षीका डॉ. स्वरूपा देवरे यांनी यावेळी व्यक्त केले. तालुक्यातील सेवाभावी संस्था व कंपन्या तसेच सामाजिक दातृत्वातुन कोविड सेंटरला अनेक मदतीचा हात मिळाल्याने रूग्ण सेवा मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे रूग्ण संख्या कमी हाेत असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, सचिव राजेंद्र नेटावटे, उपाध्यक्ष राजेश देवळेकर, सतीश पुरोहित, वाल्मिक गवांदे, भास्कर सोनवणे, सुमित बोधक, शैलेश पुरोहित, गणेश घाटकर, साई ग्लोबल ट्री शिर्डीचे प्रसाद आय्यर, किरण राऊत, आकाश शर्मा, नितीन खातळे, कृष्णा निकम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने कोविड सेंटरच्या आरोग्य कर्मचारींसाठी पीपीई कीट, हँडग्लोज आदीचे वाटप करून स्तृत्य उपक्रम राबविला. मागील वर्षीही त्यांनी यथाशक्ती मदत करून सहकार्य केले. असेच कार्य पत्रकारांनी करावे.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार इगतपुरी