नेट सेट परीक्षेत सहभागी होऊन संधींचे सोने करा : प्रा. राम जाधव

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
राज्यातील  कोरोना परिस्थिती हळूहळू आटोक्यात येण्याची स्थिती आहे. यासह आरोग्य खात्याने कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेची नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 37 व्या सेट परीक्षेची घोषणा केली आहे. ह्या परीक्षेवर कोरोनाचे असणारे सावट नाकारता येत नाही.
महाविद्यालयात अध्यापक म्हणून निवड होण्यासाठी सेट किंवा नेट यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. सर्वात अवघड असणाऱ्या परीक्षामंध्ये सेट/नेट पात्रता परीक्षेची गणना होते. फक्त 1 ते 2 टक्के इतका निकाल या परीक्षांचा लागत असतो.
26 सप्टेंबर 2021 रोजी संपूर्ण राज्यात एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील लाखो पदवीत्तर पदवी शिक्षण घेतलेले  विद्यार्थी या परीक्षेतून आपले नशीब अजमावत असतात. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 17 मे 2021 ते 10 जून 2021 असणार आहे. परीक्षेसाठी खुला गटासाठी अर्ज फी 800, इतर राखीव प्रवर्गांसाठी 650 रुपये फी असणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरून यशस्वी वाटचाल करावी. ह्या संधीचे सोने करावे असे आवाहन प्रा. राम जाधव यांनी केले आहे.