इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
नाशिक जिल्ह्याच्या कडक लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्यात ४८ कोरोना बाधितांनी कोरोनावर विजय मिळवला. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार २० नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर पर्यंत इगतपुरी तालुक्यात २२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी आगामी काळात नियमांचे पालन केल्यास इगतपुरी तालुक्याच्या कोरोनामुक्त वाटचालीला सुलभता येणार आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008
नाशिक जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्याअगोदर इगतपुरी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये विक्रमी गर्दी उसळली होती. नियमांचे पालन आणि सोशल डिस्टनिंगला हरताळ फासली गेल्याने येणाऱ्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले.
तालुक्याच्या बहुतांश भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. कही खुशी कही गम अशी स्थिती अनेक केंद्रांवर दिसून आली. ग्रामीण नागरिकांच्या मनात लसीकरण बाबत विविध अफवा आणि प्रश्न असल्याने शासनाने प्रबोधन करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ येऊनही तालुक्यात ही लस उपलब्ध नसल्याने नागरिक चिंताक्रांत आहे.