निनावी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. गावातील वयोवृद्धांसह पात्र व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. लस सुरक्षित असून यामुळे कोरोनापासून बचाव होतो अशी जनजागृती आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.
यावेळी निनावीचे सरपंच गणेश टोचे, धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शेगावकर, डॉ. संदीप वेढे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा खोब्रागडे, दीपिका मोरे, आरोग्य सहाय्यक विजय आखाडे, भाऊसाहेब सुर्यवंशी, सविता थोरात, आरोग्य सेविका जयश्री गिरी, माधवी कुलकर्णी, वनिता कुलकर्णी, प्रमिला नवले, आरोग्य सेवक राजू जारवाल, भरत जाधव, महेश वालझाडे, मुरली ठाकूर यांनी काम पाहिले. आशा गट प्रवर्तक ज्योती टोचे, आशा कार्यकर्ती लंका इरणक, चंद्रकला बगाड, तुळसा मेंगाळ, जयश्री पाठक, शरद घाणे, परमेश्वर गडदे, मुख्याध्यापक दत्तात्रय बोरसे, काळू गारे यांनी लसीकरण कार्यक्रमाला साहाय्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!