
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील हभप मनोहर मोतीराम मुसळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रबोधनकार प्रा. नितीन बानगुडे पाटील हे उद्या शनिवारी नांदूरवैद्य येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत शिवव्याख्यानातून प्रबोधन करणार आहे. भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मनोहर मुसळे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात हा भव्य व्याख्यान सोहळा होणार आहे. येथील १७२९ आचार्य ॲकेडमीच्या वतीने व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहून शिवविचारांचा जागर करावा असे आवाहन आयोजक तुकाराम मनोहर मुसळे, नांदूरवैद्य ग्रामस्थ आणि मुसळे परिवाराने केले आहे.