प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
मुकणे ग्रामपंचायतीकडून गावांतंर्गत सुतार वस्ती व आवारी गल्ली येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव व उपसरपंच भास्कर राव आदींच्या हस्ते करण्यात आला.
मुकणे येथील बहुतांश रस्ते काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील सर्वच रस्ते लवकरच काँक्रीटीकरण करण्यात येणार असुन रस्त्यांबरोबरच लाईट, पाणी व वीज या मुलभूत सुविधांसह सर्वच विकासकामे करण्यास प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सर्व गटारीही भुमीगत करण्यात येत असल्याचे लोकनियुक्त सरपंच हिरामण राव व उपसरपंच भास्कर राव यांनी सांगितले.
सुतार वस्ती तसेच आवारी गल्ली येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, पोपट वेल्हाळ, गणेश राव, भास्कर आवारी, मोहन बोराडे, किसन पोरजे, समाधान आवारी, मुन्ना बोराडे आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
आगामी काळात मुकणेच्या विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींसह गोंदे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या साहाय्याने कामे व्हावी यासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील मूलभूत सुविधांसह सर्व विकासकामे पुर्ण करण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विष्णु पाटील राव, माजी संचालक बाजार समिती