इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
स्थिर रुग्णसंख्येचा फटका इगतपुरी तालुक्याच्या कोरोनामुक्तीला बसत आहे. ३ आठवड्यापासून १० वर स्थिर झालेली रुग्णसंख्या काल ६ वर आली असतांना आज पुन्हा ६ रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. हत्ती गेला अन शेपूट राहिल्याची गत सध्या सुरू असून काही दिवसात रुग्णसंख्या शून्य होणे अपेक्षित आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार २ नवे कोरोना बाधित व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर २ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आज दिवस अखेर इगतपुरी तालुक्याची उपचार घेणाऱ्या रुग्णांची रुग्णसंख्या ६ वर स्थिर झाल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील विविध भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू असून ग्रामीण नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभत आहे. आज अखेर पर्यंत ५६ हजार २५७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008