इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
महिलांनी स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपायला हवे, आर्थिक बाबतीत निर्भर व्हायला हवे, कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटना घडत गेल्या. मात्र त्यातून कायदे अधिक कडक आणि बळकट होत गेले. प्रत्येक पालकांना वाटते की, माझी मुलगी सुरक्षित पाहिजे, खरंतर कायदा तुम्हाला संरक्षण करण्यास मदत करतो असे प्रतिपादन नाशिकच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले – श्रींगी यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी त्या प्रमुख अतितिथी म्हणून बोलत होत्या.
प्राचार्य डॉ. शाहीस्ता इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, महिलांनी सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उल्लेखनीय भरारी घेतली आहे, आपण बघतोच आहोत की स्त्री-पुरुष भेदभाव करत वर्षानुवर्षं समाज्यात महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले. मात्र आता शिका संघटित व्हा, संघर्ष करा. प्रमुख अतिथी ॲड. राजेश्वरी व्ही. बालाजीवाले यांनी महिला विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलताना तुम्ही कसे राहतात, कसा पेहराव करता यावरून तुमचे व्यक्तीत्व दिसत असते, असे स्पष्ट केले. या कार्यशाळेत महिलांसाठी हेल्थ चेकअप, ब्रेस्ट कॅन्सर, डोळे तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. मंजुषा भाऊलाल पाटील, डॉ. वैभव पोपटलाल चौधरी यांचे सहकार्य लाभले.
सावित्री महोत्सवानिमित्त रांगोळी, पोस्टर मेकिंग, मराठी निबंध, इंग्रजी निबंध स्पर्धा झाली. यात मराठी निबंध प्रथम क्रमांक जागृती बागुल, द्वितीय परवेश कादिर शेख, तृतीय सिद्धेश आघाव व संकेत चव्हाण, इंग्रजी निबंध स्पर्धा प्रथम अनघा सोनार, द्वितीय रामेश्वरी ढिकले, तृतीय गणेश घुगे, रांगोळी स्पर्धा प्रथम पायल मांडवाडे, द्वितीय दीपाली अहिरे, तृतीय श्रावणी देवरे, पोस्टर मेकिंग प्रथम क्रमांक श्रावणी देवरे, द्वितीय सय्यद जोया अझीझ आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कराटे प्रात्यक्षिक, आत्म संरक्षण प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले. यासाठी विनय शर्मा, दीपक कनोजिया आणि श्रुती प्रजापती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन विजया देशमुख ( बडे मॅडम ), सदस्य मंगल पवार उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा सावरकर यांनी तर आभार विद्यार्थिनी स्नेहल दंडगव्हाळ, सुप्रिया भामरे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शालिनी घुमरे, ग्रंथपाल मंगल पाटील, अलका सोनवणे, अंजली रौंदळकर, प्रियंका ओसवाल आदिंचे सहकार्य लाभले.