इगतपुरीनामा न्यूज, दि. 11
गेले काही दिवस सातत्याने इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे. आजही बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन संशयित रुग्णांचे आकडे कमी असल्याने तालुक्याची चिंता कमी झाली असून कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत असल्याने तालुका वासीयांना दिलासा मिळत आहे. आज तालुक्यात 39 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार 29 नव्या संशयीत रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज दिवस अखेर 256 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’शी बोलतांना दिली आहे.
■ काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
– बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी