
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. गावातून सकाळी जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय आवारात गोकुळ आगिवले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दत्तू निसरड यांनी कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थ विरोधी शपथ सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांकडून घेतली. शाळेतील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी वंदना भगत यांनी विद्यार्थ्यांकडून कवायत प्रात्यक्षिक करुन घेतले. नाशिक येथील अश्विन ननावरे, महेंद्रसिंग, चेतन मोरे, आदित्य निकळे, युवराज शिंदे, विनायक डमाळे आणि यश निखळे यांनी ‘हर घर झेंडा’ उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना राष्ट्रीय ध्वज वाटप केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास खेमचंद आगिवले, बबन आगिवले, चांगुणा आगिवले, भारत आगिवले, लहानू आगिवले, उल्हास तेलम, ग्रामस्थ यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला.
