माय माझी होती दुधावरची साय

कवयित्री : माधुरी केवळराव पाटील
जि. प. शाळा, मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक

सगळ्यांसाठी आई असते, दुधावरची साय..
प्रत्येकाने ओळखा ओ, आपापली माय…!!धृ.!!

जन्म देऊन तिने, तुला दाखविले जग..
तिच्या सोबत बोलण्यात, नको ठेऊ रे रग.. !!१!!

फार मोठे उपकार असतात, तिचे आपल्या वरी..
समजून घ्या उभ्या आयुष्यात, तिला एकदा तरी..!!२!!

ठेच लागली तुला तरी, काळीज तीच फाटतं..
कधी समजणार तुला, डोळ्यातील पाणी तिचं आटतं….!!३!!

आई असते आपल्यासाठी, थंड बर्फाचा गोळा…
लेक असतो, तिच्यासाठी पोटचा तिचा गोळा…!!४!!

बाहेर तू गेला तरी, दारात असते बसून…
उशीर तुला झाल्यावर, जाते मात्र खचून….!!५!!

ओरडू नको आईवर, कधीच तू चुकून…
ती गेल्यावर डोळे, मात्र रडून जातात सुकून…!!६!!

लावा जीव आईला आता, नका बसू रुसून…
आदर करा नेहमी तिचा, मनी घ्या ठसून…!!७!!