मातृदिनानिमित्त नाशिकचे संवेदनशील मनाचे कवी जी. पी. खैरनार यांची उत्कट कविता…!
कवी – जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
आक्का, आत्या,
काकू, वहिनी !
आपण साऱ्या,
असती बहिणी !!
ताई, बाई,
मावशी, माई !
आपण साऱ्या,
जगाच्या आई !
प्रेमाने गाई,
गोड अंगाई !
लळा लावती,
माझी आई !!
आईचं नावं,
महान श्रेष्ठ !
जगात साऱ्या,
सर्वात मोठं !!
संकट येता,
दुःखात हसवी !
आनंद होता,
सुखात फुलवी !!
ठेच लागता,
माझ्या पाया !
वेदना होई,
तिच्या हृदया !!
किती वर्णावी,
आईची ख्याती !
मायेचं भांडार,
तिची महती !!
दिवस आईचा,
एकच नसे !
वर्षचं सारं,
तिचं असे !!
( कवी नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक आहेत. )