कर्मवीरांचा पोवाडा

कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने..

कवी : ऋषिकेश बाबुराव लादे ( सहा. शिक्षक )
मॉडर्न स्कूल व ज्यु.कॉलेज, वाशी नवी मुंबई

काळ काळ होता पारतंत्र्याचा, सारा समाज अज्ञानाच्या अंधकारात हरवलेला, उजाड माळरानात, शिवारात थोडासा भरकटलेला. अशात एका विराने ज्ञानगंगा
शिवारात आणून शिक्षणाची हिरवळ फुलवून माळ शिवार शिक्षणाने हरित मय करण्याचा ध्यास घेतला होता काय होता तो ध्यास ऐका…

रयतेचा अक्ष आसमंती
ज्ञानदीप त्यावर तेवती
दाही दिशेस हा लखलखाट
ज्ञानगंगा…. आली हो आली शिवारात

असे स्वप्न अण्णांनी पाहिले. पण ते काही सोपे नव्हते अडचणींचा सामाजिक विषमतेचा जणू डोंगरच ओंजळीत पडला होता. पण अर्धांगिनी ने आपल्याकडे जे होते ते देऊन सारे सर्वार्थ स्वप्नपूर्तीसाठी दिले.

पाहिले स्वप्न अण्णांनी
साथ दिली माऊलींनी
भान राखूनी जाणला अर्थ
त्यागिले….. त्यागिले सारे सर्वार्थ

अज्ञानाने भविष्य वेध घेण्याची जाण जणू खुंटली होती होती घेण्याची जाण जणू खुंटली होती होती डोळ्यासमोर फक्त शेत आणि पोट. रानात राबराब राबून राबून दोन वेळ पोटाची खळगी कशी भरतील फक्त एवढेच डोक्यात कधी वरुणराजा रागावलाच तर डोळ्यात आलेली आसवं पुसून आहे ते सावरण्याची ताकद दैवाने मनगटात दिली.

साऱ्यांचे ध्येय समोर
काबाड कष्टातून भाकर
डगमगे न वाटेवर
प्रहार… प्रहार करी झेलुनी मनगटावर

बहुतांश समाज अज्ञानाच्या विळख्यात गुरफटून त्यांच्या विचारांची पाळेमुळे विचाराच्या गाळात पिढ्यानपिढ्या गाळात रुजली होती आणि विचारांच्या सरीतेवर अंधश्रद्धेचे जंजाळ विस्तीर्ण पसरले होते.

असे हे सारे जण
नाही रे कुणा शिक्षण
अज्ञान अंधारात
खितपत…. खितपत पिढ्यां पिढ्यांत

अशा अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या दलदलीत वटवृक्षाचे बीज रोवले पोसले. पारंब्यांच्या सहाय्याने गाळात रुतलेल्यांना बाहेर काढून ज्ञानगंगेच्या जलाशयात जाऊन उत्कर्षाचे मार्ग उत्कर्षाचे मार्ग दिले व पुरोगामी महाराष्ट्र बनविण्याचा मार्ग केला.

बीज रोऊनी वटवृक्षाचे
मार्ग देऊनी उत्कर्षाचे
घेऊनी अपार कष्ट
घडविला…. घडविला पुरोगामी महाराष्ट्र

समारोप

ज्ञानगंगेच्या तळाशी अज्ञानात रुतून बसलेल्यांना ज्ञानामृत पाजून त्यांना नवसंजीवनी देऊन पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचण्यात सिंहाचा वाटा असणारे ज्ञानदीप कर्मवीर भाऊराव पाटील व ज्ञानज्योती रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना शतशः वंदन शतशः वंदन शतशः वंदन

2 thoughts on “कर्मवीरांचा पोवाडा

  1. खूप सुंदर रचना…..ही रचना गायन स्वरूपात तुमच्या आवाजात सादर करावी ही नम्र विनंती.

Leave a Reply

error: Content is protected !!