इगतपुरीनामा न्यूज दि. 24
पेन्शनच्या व्यापक जनजागृतीसाठी 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात पेन्शन संघर्ष यात्रेचे संयोजन महाराष्ट्र राज्य जि प कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे. आज 23 नोव्हेंबरला संघर्षयात्रा नाशिक येथे आली होती तिची भव्य सभा आज दिंडोरी येथे झाली.
नाशिकमधील सर्व तालुक्यांतील पेन्शन फायटर्स विक्रमी संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. एकच मिशन..जुनी पेन्शनचा गजर याठिकाणी करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी 100 हुन जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जिल्हाभरातील पेन्शन फायटर्सची एकजुट यानिमित्ताने पहावयास मिळाली. राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर सरांनी कर्मचाऱ्यानी जुनी पेन्शन मिळेपर्यंत एकतेची वज्रमुठ कायम
ठेवण्याचे आवाहन केले. व्यासपीठावरून प्राजक्त झावरे, प्रविण गायकवाड, दीपिका एरंडे, नदीम पटेल, मिलींद सोळंकी, सुनिल दुधे यांच्यासह या संघर्षात सर्वांनी खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन केले.
इगतपुरी तालुका कार्यकारणीच्या वतीने तालुकाध्यक्ष वैभव गगे, सरचिटणीस विलास महाले, कार्याध्यक्ष-मिलींद खादे, कार्यकारिणी पदाधिकारी सोपान भोईर, अवधुत खाडगीर, विशाल सोनवणे, गुरू विधाते, मंदार उंडे, प्रशांत देवरे, रवी उन्हवणे, प्रशांत उन्हवणे, एकनाथ रेवगडे, उमेश गरूड, देवराम धोबी, सुनिल शिंदे, गणेश नाठे, गोरख तारडे, हरिश्चंद्र भाग्यवंत, नारायण गांजवे यांनी पेन्शन यात्रेत सहभाग घेतला. विविध संघटना पदाधिकारी काळुजी बोरसे पाटील, शिक्षक समिती नेते प्रकाश सोनवणे, सुनिल भामरे, प्रशांत वाघ, दाभाडे तात्या, भास्कर राक्षे, बिरारी सर, सचिन कापडणीस, सुनिल सांगळे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, शिक्षक भारतीचे दिलीप धांडे, लक्ष्मण खातळे, आदिवासी शिक्षक संघटनेचे मारूती कुंदे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य नेते अनिल बागुल, कैलास बोढारे, राहुल सोनवणे यांचे पेन्शन संघर्ष यात्रेत तालुका कार्यकारिणीकडून स्वागत केले.