इगतपुरीनामा न्यूज दि. ९ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मंगला शार्दूल मॅडम आणि शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी केक कापून सेलिब्रेशन केले तर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटप करण्यात आले.
सिद्धार्थ सपकाळे आणि श्री. गुंजाळ यांनी महीला दिनाविषयी माहीती देऊन महिलांना योग्य ते स्थान दिले गेले पाहिजे शिवाय मुलींचा जन्मदर वाढवून खरा महीला दिवस साजरा करावा असेही आवाहन केले. विद्यार्थ्यांनी महीला शिक्षिकांना टाकाऊ वस्तूपासून बनविलेले फुलदाणी, पेन स्टॅण्ड व इतर वस्तू भेट दिल्या.