त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाने बळी गेलेल्या रेशन दुकानदारांच्या वारसांना संघटनेकडून आर्थिक मदत : रेशन दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी घोषित

ज्ञानेश्वर मेढे पाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रेशन दुकानदारांची बैठक आज जनार्धन स्वामी आश्रम येथे संपन्न झाली. कोरोना नियमावली पाळून संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डोळशे पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांनी वर्गणी स्वरूपात निधी जमा केलेला निधी तालुक्यातील कोरोनामुळे रेशन  दुकानदार मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली. वारसदार दिनकर खेडूलकर, गोटीराम दिवे, आणि हेमंत तरवारे यांना प्रत्येकी ३० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.

नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना  व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर रास्त भाव दुकानदार संघटनेची बैठक आज झाली. या बैठकीत सभासदांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. कमीशन वाढ, कोरोनाने निधन झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक मदत आणि विमा कवच शासनाकडून मिळवून देणे, संघटनेतर्फे शक्य तेवढी मदत करण्यावर एकमत झाले. शासनाने तात्काळ मदत करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. ह्या मागण्यांचे निवेदन आमदारांचे प्रतिनिधी यांना आणि तहसीलदार दीपक गिरासे यांना मागणी देण्यात आले.

यावेळी त्र्यंबकेश्वर तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी  जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड पार पडली. तालुकाध्यक्ष सागर भगत, उपाध्यक्ष लालू आचारी, सचिव ज्ञानेश्वर मेढे पाटील, संपर्कप्रमुख जयवंत जाधव, खजिनदार बाळू झोले, जेष्ठ उपाध्यक्ष एकनाथ वाघेरे, सहसदस्य दत्तात्रय वेव्हारे, मारुती धनगर, गणपत जाधव, नामदेव झोले, भास्कर पाबळकर, महिला प्रतिनिधी भारती खिरारी, सुनीता भोये, युवराज चव्हाण यांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, वामनराव खोसकर, गणपत डोळसे पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, पुंडलीक साबळे, लालू अचारी, अरुण बागडे, प्रकाश नाठे, दिलीप नवले, अशोक बोराडे रास्त भाव दुकानदार आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!