इगतपुरीनामा न्यूज – आकर्षक आणि दिमाखदार मेकअप कसा करायचा हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडलेला असतो. अनेक प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी महिलांना मेकअप गरजेचा असतो. अशा प्रसंगी सर्व वयोगटातील महिलांचे मेकअप संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी घोटी येथील हर्षदा ब्युटीपार्लरने पुढाकार घेतला. घोटी ग्रामपंचायत कार्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने मध्ये खास महिलांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये नेलआर्ट आणि मेकअप कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. स्वतःचा मेकअप आणि नवरीचा मेकअप कसा करायचा याबद्धल प्रश्नांची उत्तरे देऊन प्रत्यक्षात शिकवण्यात आले. सौंदर्यामध्ये नख महत्वाचा भाग असून आपले नख कसे मोठे ठेवायचे? यासह त्याची काळजी घेण्याच्या टिप्स देण्यात आल्या. नेलआर्ट प्रकाराबद्धल सहभागी महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मोफत कार्यशाळेत जवळपास ८० सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून घोटी ग्रामपालिकेच्या सदस्या रूपाली संदिप रूपवते, आरोग्य सल्लागार सारिका शिंदे, पल्लवी शिंदे, मंगला आरोटे, नेलआर्टिस्ट नूतन राजेंद्र गोसावी, मेकअप आर्टिस्ट हर्षदा टाकळकर, नेलआर्ट मॉडेल मनिषा रत्नपारखी, नेहा गौरे, साक्षी धारणकर, मेकअप मॉडेल सलोनी ठोले, धनश्री हांडोरे आदींसह मोठ्या संख्येने महिला हजर होत्या. मोफत कार्यशाळेचा दैनंदिन जीवनात मोठा फायदा होणार असल्याबद्धल महिलांनी समाधान व्यक्त केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group