इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढतच असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आज दिवसभरात उपचार सुरू असलेले 48 बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर आज नव्याने 48 कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत. आज दिवस अखेर 371 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेग धारण करीत आहे. रोज नवे कोरोना बाधित आढळून येत आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले वाढले आहे. नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेतली तर कोरोनाला हरवण्यात येऊ शकते असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचना आणि पोलीस यंत्रणेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. घोटी, गोंदे दुमाला आणि तालुक्याच्या विविध भागांतील जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद लाभला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group