इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील धाडसी चोऱ्यांचे सत्र थांबायचं नाव घेत नाही. मागील आठवड्यात तळेगाव शिवारातील चिवाज वाईन शॉप मध्ये पावणेतीन लाखाची जबरी चोरी झाली होती. त्या चोरीतील गुन्हेगारांचा अजून तपास लागत नाही तोच चिवाज वाईन शॉपी जवळून ५०० मिटर अंतरावर असणाऱ्या हॉटेल साई प्लाझा येथे मध्यरात्रीच्या सुमारास परत धाडसी चोरी झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी किचनची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत १ लाख ५ हजार रुपये रोख व जवळपास १ लाख रुपयांची महाग दारू असा जवळपास २ लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही च्या डिव्हीआरची चोरी करून लूट केली आहे. सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे चोरट्यांनी इगतपुरी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या घटनेमुळे महामार्गावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. असेच चोरीचे सत्र सुरू राहिल्यास व्यवसाय कसा करावा हा यक्ष प्रश्न उभा ठाकला असून रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वेळीच जर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर व्यवसाय करणे अवघड जाणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group