
इगतपुरीनामा न्यूज – १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ हा ९ ते १२ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य प्रबोधिनी, रामटेकडी, पुणे व राज्य राखीव पोलीस बलगट १ व २ रामटेकडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. गुन्हे व गुन्हेगार शोध व जोडणी प्रणाली Crime and Criminal Tracking Network and System (C.C.T.N.S) या कार्यप्रणालीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने सन २०२४ वार्षिक गुणांकनामध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकाच्या पारितोषीकावर आपले नाव कोरले. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सर्व विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सी.सी.टी.एन.एस. मधील नोंदणी, सी.सी.टी.एन. एस. प्रणालीचा वापर करून पोलीस ठाण्यात अटक होणाऱ्या आरोपीतांची कुंडली जुळवून गुन्हे उघडकीस आणण्याची प्रभावी कार्यवाही केली आहे. आज पुणे येथे संपन्न झालेल्या दिमाखदार बक्षीस वितरण समारंभात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह गुन्हे व गुन्हेगार शोध व जोडणी प्रणाली विभागातील कार्यरत अंमलदार महिला पोलीस हवालदारांचे अभिनंदन करून कौतुक केले. महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, महिला पोलीस हवालदार सिमा उगलमुगले, ज्योती अहिरे, प्रतिभा शिंदे यांचा महाराष्ट्रात सी.सी.टी. एन.एस. विभागात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला सन २०२४ या वर्षाचे द्वितीय क्रमांक विजेता सन्मानचिन्ह व बक्षिसपत्र देवुन गौरव केला आहे.