
इगतपुरीनामा न्यूज – शनिवारी सायंकाळी वाडीवऱ्हे कौटीफाट्यावर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना ३ युवक ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट मिळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांना तुम्हाला फाईन भरावा लागेल असे सांगितले. युवकांना या बोलण्याचा राग आला. त्यांना पोलीस कायदेशीर बाबी समजावुन सांगत असताना युवकांनी आम्ही कायदा बियदा कोलतो अन पोलीसांना बी कोलतो. आम्ही इथलेच असुन तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणुन शिवीगाळ केली. युवकांना सरकारी वाहनात पोलीस ठाण्यात नेत असताना गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जोरजोरात अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. आम्ही करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कर्मचारी केशव शिवाजी बस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी १) सागर रामहरी धोंगडे २) शाम तानाजी गव्हाणे ३) अंदाजे २० ते २२ वर्षाचा मुलगा ( नाव गाव माहित नाही ) सर्व रा. कुऱ्हेगाव ता. इगतपुरी जि. नाशिक या तिघा युवकांवर सरकारी नोकरावरील हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३२, २२१, ३५२, ३५१(२), ३ (५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. वाडीवऱ्हे पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.