इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विठ्ठल देवराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच विठाबाई पांडुरंग रजेवर असल्याने विद्यमान उपसरपंच विठ्ठल शिंदे यांना प्रभारी सरपंच पदाची सूत्रे देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे परिसरातून स्वागत होत आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, छावा संघटनेचे अध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख संपत काळे, शेतकरी नेते पांडुरंग मामा शिंदे, कचरू पाटील शिंदे, सखाराम गव्हाणे, माजी सरपंच विठोबा नाना शिंदे, निवृत्ती शिंदे, ग्रामसेवक संतोष हांडगे, संजय शिंदे, किसन शिंदे, खंडू शिंदे, प्रकाश शिंदे, उपसरपंच संजू बोराडे, चेअरमन नामदेव शिंदे, अमृता बोराडे, मनोज सोमवंशी, योगेश शिंदे, नवनाथ शिंदे, नटराज जगताप, सुनील जगताप, सुभाष शिंदे, शिवाजी शिंदे, दाजीराम शिंदे, वासुदेव गावंडे, योगेश शिंदे, तानाजी मामा शिंदे, रामकृष्ण शिंदे, महेश गावंडे, शिक्षक बोराडे, दादाभाऊ शिंदे, बाजीराव शिंदे, मुख्याध्यापक देविदास शिंदे, आकाश शिंदे, नरेश शिंदे, अनिल जगताप, तुकाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या