स्वातंत्र्य दिन व अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त इगतपुरीत तिरंगा रॅली आणि जनजागृती मोहीम उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त इगतपुरी शहरातून तिरंगा रॅली आणि जनजागृती मोहीम उत्साहात पार पडली. गांधी चौक येथील स्मारकास पोलिसांकडून पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत इगतपुरी पोलीस ठाणे, लोहमार्ग पोलीस ठाणे, लिटिल ब्लॉसम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी हातात नशामुक्तीचे संदेश असलेले फलक घेऊन नागरिकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक केले. रॅलीदरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देऊन व्यसनमुक्त समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या रॅलीत इगतपुरी ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस हवालदार विनोद गोसावी, प्रदीप घेगडमल, निलेश देवराज, महेंद्र गवळी लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरीचे सहा. फौजदार हेमंत घरटे, पोलीस हवालदार योगेश पाटील, बापुसाहेब गुहील, योगेश साळेकर लिटिल ब्लॉसम स्कूलचे संचालक दीपक बढाया, अजित बाफना, शांतीलाल चांडक, सचिन सेठी मुख्याध्यापिका सुष्मिता मंत्री, शिक्षक दीपक गायकवाड, तेजश्री चौधरी, मनीषा आहेर, युगंधर निरभवणे, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, गजानन गोफणे आदी उपस्थित होते. व्हिडिओ बातमी पहा  https://youtu.be/PUvZqFA_oyw

error: Content is protected !!