बेलगाव तऱ्हाळे येथे कोरोना लसीकरणाला अभूतपूर्व प्रतिसाद
लस घ्याल तरच जीव वाचेल : पांडुरंग वारुंगसे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेगावकर यांनी नागरिकांना यावेळी मार्गदर्शन केले.
बेलगाव तऱ्हाळे येथील ज्येष्ठ नागरिक, कामगार, महिलांनी स्वतःहून पुढे येत लसीकरण करून घेतले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची तपासणी करण्यात आली. लसीकरणाबाबत शंका समाधान आणि गैरसमजाबाबत डॉ. शेगावकर व उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सुवर्णा आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, समाधान वारुंगसे, प्रमिला वारूंगसे, राधिका तातळे उपस्थित होते.
लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मोरे मॅडम, सुपरवायझर सूर्यवंशी नाना, आरोग्य सेवक भरत जाधव, आखाडे,  मुरली ठाकूर, राजू जाखळे, ए. के. मुंढे, आरोग्यसेविका कुलकर्णी, श्रीमती थोरात, श्रीमती गिरी, राजश्री पाठक, ज्योती टोचे, परमेश्वर घाडगे, आशा स्वयंसेविका वनिता वारुंगसे, विजया चव्हाण, सुशीला तातळे, मुख्याध्यापक प्रदीप ढेंगळे, राजाराम इदे, ग्रामसेविका श्रीमती गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी मधुकर आव्हाड, राजू तातळे उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांचा  लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्धल ग्रामपंचायतीने सर्वांचे आभार मानले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमचे बेलगाव तऱ्हाळे गावकऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. लसीकरण हाच सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा चांगला मार्ग आहे. नागरिकांमध्ये चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याने सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करून लस घ्यावी. लस घेऊन नियमांचे पालन केल्यास ह्या काळात कोविडपासून बचाव होऊ शकतो.
पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!