स्थानिक गुन्हे शाखा व वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी : चोरीच्या ३ मोटरसायकल हस्तगत करून गुन्हा उघड

इगतपुरीनामा न्यूज – स्थानिक गुन्हे शाखा व वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त नाकाबंदी कारवाई दरम्यान असताना गुप्त बातमीनुसार एक इसम वाडीवऱ्हे परिसरात चोरीची मोटरसायकल घेऊन वावरत आहे. ह्या बातमी नुसार नमूद पथकाने सापळा रचून एक प्लॅटिना वरील इसमाचा पाठलाग करून त्याच्या कब्जातील चोरीची मोटरसायकल हस्तगत केली. ह्या चोरी बाबत देवळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटरसायकल त्याचे ताब्यातून काढून दिल्या. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, तपास पथकातील प्रविण काकड, शरद धात्रक, ज्ञानेश्वर सानप, शिरीष गांगुर्डे, उल्हास धोंगडे यांनी कारवाई करून आरोपी अटक केले. आरोपीकडून ३ मोटरसायकल हस्तगत केल्या आहे. मयूर अनिल जाधव, रा. गंगापूर गाव, गोवर्धन ता. जि. नाशिक असे आरोपीचे नाव आहे.

error: Content is protected !!