वाडीवऱ्हे भागात स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई : अवैध शस्त्र बाळगणारे ४ आरोपी अटक ; तलवार, चॉपर, नकली बंदूक, कोयता, मोटरसायकली जप्त

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्धीतील घडणाऱ्या चोऱ्या, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय आहे. त्यानुसार पथकातील शरद धात्रक, प्रविण काकड, सचिन गवळी, ज्ञानेश्वर सानप हे पोलीस कर्मचारी वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्धीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांनी गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली. त्याप्रमाणे सतीश लक्ष्मण लोहरे, रा. आंबे बहुला ता. जि. नाशिक, रोशन बाळु कचरे, कृष्णा दशरथ दुंटे, संतोष बाळु लहांगे रा. लहांगेवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक असे त्यांचे जवळील दोन लाल काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर गुन्हेगारीच्या उद्धेशाने तलवार, कोयता व चॉपर सारखे प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगुन नाशिककडुन वाडीवऱ्हेकडे जात असल्याचे समजले. या व्यक्तींचा शोध घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हवालदार प्रविण काकड यांनी वाडीवऱ्हेचे पोलीस ठाण्यात कळवुन मदत मागितली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे, हवालदार शिरीष गांगुर्डे हे तुळजा हॉटेल रायगड नगर येथे आले. पथकातील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना समजावुन सांगुन प्रविण काकड यांनी हवालदार शिरीष गांगुर्डे यांना दोन पंचास बोलविण्यास सांगून हजर केले. पंचाना हकीगत समजावुन सांगण्यात आली. त्याप्रमाणे सतीश लक्ष्मण लोहरे, रा. आंबे बहुला ता. जि. नाशिक, रोशन बाळु कचरे, कृष्णा दशरथ दुंटे, संतोष बाळु लहांगे रा. लहांगेवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांना अडवून अंगझडती, मोटारसायकल झडती घेण्यात आली. सतीश लक्ष्मण लोहरे याच्या ताब्यातील पल्सर गाडी क्र. MH 15 FX 5833 किंमत ५० हजार, कृष्णा दशरथ दुटे याची पल्सर गाडी MH 15 HN 1077 किंमत ५० हजार, १ हजाराची एक लोखंडी तलवार, संतोष बाळु लहांगे याच्याकडे मिळालेली एक प्लास्टिकची पिस्तुलसदृश खेळण्यातील बंदुक, रोशन बाळु कचरे याच्याकडे १ लोखंडी धातुचा चॉपर किंमत ५००, कृष्णा दशरथ दुटे याच्याकडे १ हजाराची लोखंडी तलवार, ५०० चा कोयता असा एकूण १ लाख ३ हजाराचा मुद्धेमाल सापडला. २ लोखंडी धातुच्या तलवारी, १ लोखंडी चॉपर, १ लोखंडी कोयता, १ प्लॅस्टीकची पिस्तुलसदृश खेळण्यातील बंदुक व २ मोटारसायकल असे गुन्हेगारी करण्याच्या उद्धेशाने कब्जात मिळुन आल्याने तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्या. मिळालेली हत्यारे गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार शरद धात्रक यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघा जणांना अटक करण्यात येऊन कसून तपास केला जात आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!