
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळातर्फे करण्यात आली आहे . यावर्षी ‘जीवन गौरव’ पुरस्कार – नानासाहेब बोरस्ते यांना, ‘सर्वतीर्थ ‘पुरस्कार – ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांना तर ‘वारकरी भूषण ‘पुरस्कार- हभप अशोक महाराज धांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘साहित्य जागर’ पुरस्कार -गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेला तर ‘काव्यरत्न’ पुरस्कार – कवी अशोक भालेराव यांना, ‘अक्षरदूत’ पुरस्कार – ॲड. मिलिंद चिंधडे यांना, ‘ज्ञानदूत’ पुरस्कार – शिक्षक सुनील गुळवे यांना, ‘सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार- संघपती नंदू शिंगवी यांना, ‘दारणा गौरव’ पुरस्कार – रोहिदास उगले यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, उपाध्यक्ष ग्रंथमित्र बाळासाहेब फलटणे, विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, रवींद्र पाटील, हिरामण शिंदे, सुदर्शन पाटील, शरद मालुंजकर यांनी दिली. पुरस्कारांचे वितरण शनिवारी १५ फेब्रुवारीला वाडीवऱ्हे येथील इंदुमती लॉन्स येथे आयोजित २५ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कवी, लेखक, आणि साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.