भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरीतर्फे घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदेचा सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – घोटी पोलीस ठाण्यात नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण ऊदे यांचा भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आजी माजी सैनिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सैनिकांच्या कोणत्याही कार्यासाठी प्रतिसाद देऊन नेहमीच त्यांच्यासाठी तत्पर असू असे सांगितले. याप्रसंगी भारतीय माजी सैनिक संघटनेचे ज्येष्ठ माजी सैनिक सुकदेव कुकडे, विलास संधान, अध्यक्ष यादव पटेकर, उपाध्यक्ष तुकाराम काजळे,  सचिव मनोहर भोसले, खजिनदार भगवान सहाणे, सहसचिव ज्ञानेश्वर वारुंगसे, वीरनारी शैला पाचरणे,अर्जुन भांगरे, बाजीराव झनकर आदी आजी माजी सैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!