इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित घोटी येथील AS क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबमार्फत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर हे उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती आयोजक तथा संचालक आशर जाकीर शेख, सकलेन रफीक शेख, साहिल जाकीर शेख यांनी दिली. या शिबीराच्या आयोजनासाठी संजीवनी हॉस्पिटल व देवश्री बालरुग्णालय घोटी यांनी मोलाचे सहकार्य केले. यापुढेही घोटी आणि इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहू असा विश्वास आयोजकांनी उपस्थितांना दिला.
शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा नेते शिवा काळे, जाकीर शेख यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. रुग्णसेवेचे व्रत घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा करण्यासाठी पुढे आल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. मोफत आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासनी शिबीरात ७८ गरजूंनी तपासणी आणि उपचाराचा लाभ घेतला. ३६ रक्तदात्यांनी रक्तदानात भाग घेऊन बहुमोल कार्य केले. या कार्यक्रमाला डॉ. रमेश सातपुते, डॉ. श्रीकांत चौधरी, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, समता ब्लड बँक, सातपुते हॉस्पिटल, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी इगतपुरी तालुक्याच्या विविध क्षेत्रातील हजर राहून उपस्थिती नोंदवली.