शासन निर्णयातील बदली पात्र शब्दामुळे अनेक शिक्षकांचे नुकसान- आमदार डॉ. सुधीर तांबे : शिक्षक भारतीकडून आमदार सुधीर तांबे यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा १४ ऑगस्ट २००८ चा शासन निर्णय अतिशय अन्यायकारक असून २००२ च्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयाच्या पूर्णपणे संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यातील बदलीपात्र शब्दामुळे महाराष्ट्रातील आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील बिकट परिस्थितीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींना त्रास सोसावा लागतो,। विविध अडचणींचा सामना करून अतिदुर्गम डोंगराळ संवेदनशील भागात आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय प्रामाणिकपणे व तळमळीने शैक्षणिक स्तर उंचावण्याचे काम करूनही त्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा, यासह सर्वसमावेशक सुधारित शासन निर्णय काढण्यासाठी पाठपुरावा करून आदिवासी भागात काम करणार्‍या शिक्षकांचा प्रश्न सोडवणार असे आश्वासन नाशिक पदवीधर संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिले.

शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, तालुका सचिव मनोहर राठोड, तालुका संघटक शिशुपाल वाघमारे, मुख्याध्यापक विलास सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या सेवानिवृत्त पेन्शनसाठी बीडीएस प्रणाली, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मानधन वाढ, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा फरक हप्ता, अर्धवेळ शिक्षकांची सेवाशास्वती, जुनी पेन्शन योजना, आदिवासी भागातील काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी एकस्तर १२ वर्ष, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ६ वर्ष, वेतन निश्चितीच्या समस्या, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शुल्क माफी, त्रुटीमध्ये असलेल्या शाळा कॉलेज साठी 20 टक्के अनुदान, प्रचलित पद्धतीने अनुदान अशा विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. आमदार तांबे यांनी टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. या निर्णयाचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जयवंत भाबड, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, मोहम्मद शमी शेख, जितेंद्र आरु, रूपाली कुरुमकर, सचिन जासूद, अमोल चंदनशिवे, माफीज इनामदार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, अमोल वर्पे, रूपाली बोरुडे, सचिन लगड, श्याम जगताप, संजय तमनर, संभाजी पवार, संतोष देशमुख, योगेश हराळे, सोमनाथ बोनंतले, ज्ञानेश्वर काळे, गोवर्धन रोडे, प्रवीण मते, हर्षल खंडीझोड, दादासाहेब कदम, संतोष निमसे, संजय पवार, संजय भुसारी आदी पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!