
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी तिने राहत्या घरी ओढणीने गळा आवळून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तिच्या वडिलांनी याबाबत घोटी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. कु. रोहिणी शिवाजी कचरे m, वय १६ असे दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिचे वडील शेळ्या चारायला शेतात गेले होते तर मोठी बहीण व आई कामानिमित्त बाहेर गेले होते. वडील शिवाजी कचरे घरी आल्यावर घरात मुलीचा लटकलेला मृतदेह निदर्शनास आला. घटनास्थळाहुन विद्यार्थिनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याआधारे आत्महत्या करायला कारणीभूत असणाऱ्याचा उलगडा होणार आहे. घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार घोटी पोलीस पुढील तपास करत आहेत.