इगतपुरीनामा न्यूज, दि. 14
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील पहिली ते दहावीचे 20 ते 30 विद्यार्थी शिक्षणासाठी मोठा खडतर सामना करीत आहेत. शाळेत जाण्यासाठी रोज विहिराचा ओहळ, जूनवणेचा ओहळ, देवीचा ओहळ अशी नदीची तीन पात्रे पार केली जातात. त्यानंतर उघडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदीला जास्त पूर आला. शाळेत गेलेली सर्व मुले अडकून पडली. त्यामुळे या सर्व मुलाना पालकांनी उचलून जीवावर खेळून नदी पार केली. हा नदी पार करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या ठिकाणी तात्काळ पुल बांधून येण्याजाण्याची सुविधा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विडिओ बातमी पहा https://youtu.be/u8z_hqnpAMs