वाडीवऱ्हेजवळ अपघातात इगतपुरीतील ४ जण गंभीर जखमी : जखमींमध्ये पतिपत्नी आणि २ बालकांचा समावेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. आज रात्री सव्वा आठ वाजता वाडीवऱ्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. ह्या अपघातात इगतपुरी शहरातील ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पतिपत्नी आणि २ लहान बालके आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. MH 15 HK 8381 ह्या क्रमांकाच्या मोटारसायकलीने नाशिकहून इगतपुरीच्या दिशेने संतोष साहेबराव पवार वय ३५ हे पत्नी आरती संतोष पवार वय २७, निखिल संतोष पवार वय ६,  शिवानी संतोष पवार वय ४ सर्व रा. तीन लकडी इगतपुरी हे जात होते. सव्वा आठच्या सुमाराला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघात झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.  

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!