इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
हिंदी दिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. ह्या स्पर्धेत बलायदुरी, माणिकखांब, वाघेरे, खैरगांव, गोंदे दुमाला आदी गावांतील शाळांनी सहभाग घेतला. विद्यालयातील शिक्षिका हिंदी विभागप्रमुख विजया पाटील – देवरे, उमेश महाजन यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करून आदर्श घालून दिला आहे असे कौतुक मुख्याध्यापक भगवान जाधव यांनी यांनी यावेळी केले. ह्या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर लक्षवेधी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
5 ते 7 वी या लहान गटात पहिला क्रमांक श्रावणी भोर, दुसरा क्रमांक आरती चव्हाण, तिसरा क्रमांक प्रणिता चोरडिया यांनी पटकावला. 8 वी ते 10 वी ह्या मोठ्या गटात पहिला क्रमांक संचिता धांडे, दुसरा क्रमांक ज्योती भास्कर सोनवणे, तिसरा क्रमांक कोमल बोराडे यांनी मिळवून प्राविण्य मिळवले. उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक अनुज पाठक, द्वितीय क्रमांक प्रणाली पोटकुले यांनी मिळवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून
अनिल पाटील, अरुण चव्हाण, संजय धात्रक, उज्वला फुलपगारे यांनी यशस्वी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक भगवान जाधव, विजया पाटील, भारती शिंदे, एकनाथ पवार, प्रमिला निर्मळ, सुरेखा चव्हाण, दगडु तेलोरे, रमेश खैरनार, माणिक देशमुख, सुनील वाणी, विनायक लाड, ओमानंद घारे यांनी विशेष परिश्रम घेतले.