पांडुरंग वारुंगसे यांच्या प्रयत्नांनी तातळेवाडी येथे सौरऊर्जा पथदीप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ नाशिक, निरजा ग्रुप, रिंग प्लस ॲक्वा यांच्या साहाय्याने अनेक उपक्रम राबवले जातात. ह्यानुसार ह्या उपक्रमाच्या सहकार्याने २ सौरऊर्जा पथदीप मिळवण्यात आले. हे दोन्ही सौरऊर्जा पथदीप तातळेवाडी येथे प्राथमिक शाळेमध्ये उभे करण्यात आले आहे.

ह्याचा फायदा शाळा आणि तातळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे. जवळपास असलेल्या डोंगरी परिसरामुळे होणारा वन्यप्राण्यांचा वावर आणि त्याचा संभाव्य त्रास या पथदीपामुळे कमी होणार आहे. पथदीप मिळवण्यासाठी रोटरी क्लब, नीरजा ग्रुपच्या पदाधिकारी सुखदा पाराशरे यांची मदत मिळाली.

माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सुवर्णा आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, सुशीला तातळे, विठ्ठल तातळे, अंगणवाडी मदतनीस आशा तातळे, रामदास तातळे, ज्ञानेश्वर तातळे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक वर्ग, पालक आणि ग्रामस्थांनी सेवाभावी संस्थांचे आभार मानले.