
इगतपुरीनामा न्यूज – कॉम्रेड उदाराम तुळशिराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाचे विभाग प्रमुख श्री.दिपक खैरनार सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने दर्जेदार कविता सादर केल्या तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतातून विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय जगताप सर, गोसावी मॅडम व अहिरे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच अध्यक्षीय मनोगतातून श्री.दिपक खैरनार सरांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व समजावून सांगताना मराठी भाषा वृद्धिगत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दररोज मराठी भाषेमध्ये संवाद साधणे महत्त्वाचे आहे तसेच कुसुमाग्रजांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. कुसुमाग्रजांची अनेक दर्जेदार पुस्तके आपल्या विद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत ती वाचून आपले विचार समृद्ध करावेत असे आव्हान त्यांनी यावेळी केले. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. गांगुर्डे सर यांनी अतिशय सुंदर असे मराठी भाषा गौरव दिनाचे फलक लेखन केले होते. विद्यालयाचे शिक्षक सन्माननीय सचिन अहिरे सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती नयना गोसावी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले