किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. देशात सगळीकडे प्रजासत्ताक दिवसाची जोरदार तयारी सुरु आहे. शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र भारतात लोकशाहीची स्थापना झाली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला इतिहासामध्ये विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाला शाळा कॉलेजच्या अंगणात काढण्यासाठी काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. या रांगोळ्या रेखाटन केले रांगोळी आर्टिस्ट माधुरी पैठणकर यांनी केले आहे. विकत आणलेली फुले टाकून देण्याऐवजी तुम्ही त्याच फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता. नारंगी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या मध्यम आकाराच्या पट्या काढून त्यात तुम्ही अशोकचक्र किंवा इतर कोणत्याही डिझाइन्स काढू शकता. गोलाकार आकाराची डिझाईन काढून त्यात तुम्ही भारताचा तिरंगा किंवा कोणताही गरजेचा संदेश लिहू शकता. रांगोळी काढताना प्रामुख्याने हिरव्या, पंधरा आणि नारंग या रंगाचा ब्लॉऊज वापरू शकता. शाळा किंवा कॉलेजच्या अंगणात मोठी जागा असेल तर तुम्ही या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता. या पद्धतीची रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र रांगोळी काढल्यानंतर ती अतिशय सुंदर दिसेल. संस्कार भारती रांगोळीमध्ये ३ रंगाचा वापर करून तुम्ही काडीच्या साहाय्याने या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता. या बातमीच्या शेवटी रांगोळी डिझाईन आणि व्हिडिओ दिला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group